ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

शहर : मुंबई

 सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून  राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष 2011-12 च्या तुलनेत वर्ष 2017-18 मध्ये ही वाढ 27 हजार टन आहे.

केंद्रीय मत्स्यपशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथील मिडीया सेंटर मध्ये देशातील मत्स्य क्षेत्राची इत्यंभूत माहिती असणा-या ‘सांख्यिकी  पुस्तिका 2018 चे  प्रकाशन केले. या पुस्तिकेत वर्ष 2011-12 ते 2017-18 पर्यंतची देशातील मस्त्य क्षेत्राशी निगडीत विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे.

सागरी मत्स्य उत्पादनात राज्य चौथ्या स्थानावर

देशात 8 हजार 118 कि.मी. चा समुद्रकिनारा असून महाराष्ट्राला 720 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राने पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ष 2017-18 मध्ये राज्यात समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन 4 लाख 75 हजार टन असून महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. 7 लाख 1 हजार टन उत्पादनासह गुजरात पहिल्या,6 लाख 5 हजार टन उत्पादनासह आंध्रप्रदेश दुस-या तर 4 लाख 97 हजार टन उत्पादनासह तामिळनाडू तिस-या स्थानावर आहे. वर्ष 2017-18 मध्ये देशातील 13 राज्य-केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 36 लाख 88 हजार टन सागरी मत्स्य उत्पादन झाले आहे.

मत्स्य उत्पादनात 27 हजार टनांची वाढ

राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात  वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष 2011-12 मध्ये राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन 5 लाख 79 हजार टन होते तर वर्ष 2017-18 मध्ये मत्स्य उत्पादनात 27 हजार टनांची  वाढ होवून एकूण उत्पादन 6 लाख 6 हजार टन एवढे झाले आहे. वर्ष 2011-12 पासून प्रत्येक वर्षी राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.

मागील आठ वर्षात राज्याला 128 कोटी वितरीत

 वर्ष 2010-11 ते 2017-18 अशा एकूण आठ वर्षात महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून एकूण 128 कोटी 86 लाख 81 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला. वर्ष 2010-11 मध्ये राज्याला 7 कोटी 17 लाख 63 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला होता. यात वाढ होवून  राज्याला वर्ष 2017-18 मध्ये  22 कोटी 56 लाख 81 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

राज्यात 5 बंदरांच्या विकासासाठी निधी मंजूर

वर्ष 2017-18 मध्ये राज्यातील 5  बंदरांच्या विकासासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. यात अर्नाळा बंदरास 61 कोटी 56 लाखमिरकरवाडा बंदरास 71 कोटी 80 लाख 88 हजारससुन डॉक बंदराच्या आधुनिकीकरणासाठी 52 कोटी 17 लाख , कारंजा बंदाराच्या सुधारीत विकास आरखडाच्या अंमलबजावणीसाठी 149 कोटी 80 लाख तर आनंदवाडी बंदरास 88 कोटी 44 लाख रूपये मंजूर झाले आहेत.

मागे

महाराष्ट्र आणि न्यूजर्सी दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींवर भर - मुख्यमंत्री
महाराष्ट्र आणि न्यूजर्सी दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींवर भर - मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य व....

अधिक वाचा

पुढे  

अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक
अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक....

Read more