ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 30, 2021 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दणका; वीज कनेक्शन कापण्याची नोटीस

शहर : पुणे

कोरोना (Corona) लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले (Electricity bill) आली आहे. काहींना अद्याप विद्युत बिले  (Electricity) भरलेली नाही. भरमसाठ आलेली वीजबिले रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी करण्याची मागणी होत आहे. असे असताना आता राज्य सरकारने वीज थकबाकीदारांना मोठा शॉक दिला. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकबाकी साचल्यामुळे सरकारने आता वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीसा (Notice of disconnection of power connection) बजावल्या आहेत.

71.68 लाख ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं कारण देण्यात आले आहे. ग्राहकांकडे 60 हजार कोटी रूपये थकीत असल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीसा पुणे विभागातील ग्राहकांना बजवाण्यात आल्या आहेत.

राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. नोटीसची मुदत 30 जानेवारीला संपेल. त्यानंतर सोमवारपासून वीज कनेक्शन कापण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबरपासून नोटीसा पाठवायला सुरूवात झाली आहे. यात थकबाकी भरण्याचे आवाहन करून 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिलात सवलत देण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

 

मागे

Mumabi Local : लोकलची वेळ पाळली नाही तर होणार कठोर शिक्षा
Mumabi Local : लोकलची वेळ पाळली नाही तर होणार कठोर शिक्षा

अखेर अनेक महिन्यांनंतर सर्व सामान्य जनतेसाठी लोकल सेवा चालू होणार आहे. मुं....

अधिक वाचा

पुढे  

Budget 2021 : २०२१ साल सुरू होताच IPO गुंतवणूकदारांना मोठा झटका
Budget 2021 : २०२१ साल सुरू होताच IPO गुंतवणूकदारांना मोठा झटका

२०२१ हे वर्ष सुरू होण्याअगोदरच IPO शेअर बाजाराची सुस्त सुरूवात केली आहे. भारत....

Read more