By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया परिसरात सेफ्टीक टँक स्वच्छ करताना 3 कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. तर 5 कामगार जखमी झाले आहेत. अमित पहाल (वय 20), अमन बादल(21) आणि अजय बुंबक (24) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.
या केंद्रातील टाकीच्या साफसफाईसाठी आठ कामगार टाकीत उतरले. मात्र, सर्व कामगार त्या टाकीत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या मोहीमेनंतर सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ पैकी तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यातील 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला तर 5 कामगारांना सुखरुप बाहेर करण्यात यश आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर भ्रष्टाचारी नंबर 1 असल्याचा आरोप ....
अधिक वाचा