By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 20, 2024 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
राज्यात आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या पावसानं अद्याप उसंत दिलेली नसतानाच आता पावसाचा जोर आठवड्याच्या शेवटी चांगलाच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागर क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं येत्या काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. परिणामी कोकणासह मुंबईचं किनारा क्षेत्र, उपनगरीय भाग आणि कोकणातील संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
फक्त कोकणच नव्हे, तर राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रही पावसानं ओलचिंब होणार असून, यादरम्यान या सर्व क्षेत्रांमध्ये असणारे जलप्रवाह दुपटीनं वाहणार असल्याचं सांगत पावसाळी सहलींच्या अनुषंगानं बेत आखणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या कमी दाबाचा एक तीव्र पट्टा दक्षिणेकडे सक्रिय असून, राजस्थनातील जैसलमेरकडेही पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर, गुजरातपासून केरळपर्यंत पावसाचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढल्यामुळं ओडिशापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाब क्षेत्र अधिक प्रभावीपणे तयार होताना दिसत आहे. परिणामी राज्यातील कोकण आणि विदर्भ पट्टा यामुळं प्रभावित होताना दिसणार आहे.
कोणकोणत्या भागात अलर्ट जारी?
यलो अलर्ट- मुंबई, पालघर, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर
ऑरेंज अलर्ट – रायगड, ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, अमरावती
रेड अलर्ट – रत्नागिरी, चंद्रपूर
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | GARJA HINDUSTAN | GARJA HINDUSTAN NEWS । Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | GARJA HINDUSTAN Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | गर्जा हिंदुस्तान |
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्ह....
अधिक वाचा