By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्टात जून पासून आता पर्यत सरासरी १०९ टक्के पाऊस पडला असून पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली भागात अनुक्रमे १२४ आणि २३३ टक्के पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच सरासरीच्या प्रमाणापेक्षा अधिक पाऊस ह्या भागात पडला आहे,
ह्या पाऊसामुळे आता पर्यंत १४४ जणांचे जीव गमवावे लागले आहेत. तर हजारो जीवांना मृत्युच्या दरवाज्याजवळ नेऊन परत आणले आहे. माणसांची ही अवस्था असताना मुक्या जनावर आणि वन्य जीवांची तर अवस्था हयाहूनहि बिकट झाली आहे.
ह्या पुरामुळे कोल्हापुरातील तब्बल २३९ तर सांगलीतील ९० गावांना पुराचा फटका बसला. शेतवडीत पाऊस कमी होऊनही अजूनही पाणी कमी होण्याचा वेग मंद असल्याने अन्नधान्याचा तुटवडा आतापासुनच जाणवू लागला आहे. येत्या काळात ही अवस्था अजूनच भीषण होण्याची भीती वाटत आहे.
राज्यसरकारने १५४ कोटी रुपयांची मदत घोषित केली असली तरी पूरग्रस्त भागात ही मदत योग्य प्रकारे पोहोचून सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी अजून बराच काळ जावा लागणार आहे. अनेक सामाजिक संघटना , संस्था , कार्यकर्ते ,कलाकार, लष्कर , नौदल , हवाई दल , एनडीआरएफ चे जवान आपल्या परीने मदत करत आहेत तरी क्षेत्र मोठ आणि मदत कमी अशी स्थिती काही ठिकाणी झाली आहे. त्यामुळे आपत्ती निवारण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, आपली किती तयारी आहे. हे ही दिसून आले आहे.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी छेडण्यात येणारे आंदोलन तूर्तास काह....
अधिक वाचा