ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एप्रिलपासून ६ टक्क्यांनी वीजदर वाढण्याची शक्यता 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एप्रिलपासून ६ टक्क्यांनी वीजदर वाढण्याची शक्यता 

शहर : मुंबई

       मुंबई- सध्या देशात आर्थिक मंदीमुळे सर्वत्र चिंतेचे सावट आहे. छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायात कामगार कपातीचे प्रमाण वाढले आहे. अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. सहाजिकच प्रत्येकाचे महिन्याचे बजेट कोलमडले असतानाच आता वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणने ५ हजार ९२७ कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एप्रिल २०२० पासून वीजदर ५.८० टक्क्यांनी वाढणार आहे.


    राज्यात सध्या १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीजदर प्रतियुनिट ३.५ रुपये आहे. हा वीजदर दरवाढीनंतर प्रतियुनिट ३.३० रुपये होईल. म्हणजेच प्रतियुनिट २५ पैशांनी वीज महागणार आहे. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजदर प्रतियुनिट ६.९५ रुपये आकारला जातो. तो प्रतियुनिट ७ रुपये ३० पैसे होईल. म्हणजे तो ३५ पैशांनी वाढणार आहे. मात्र ३०१ युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा वीजदर आहे तोच ठेवण्यात येणार आहे. 


   तसे पाहिले तर महावितरणने सलग पाच वर्षात २० टक्क्यांहून अधिक दरवाढ टप्प्याटप्याने करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीसाठी ५.८० टक्के केला आहे. त्यानुसार एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी ३.२५ टक्के, २०२२ ते २०२३ दरम्यान २.९३ टक्के, २०२३ ते २०२४ साठी २.६१ टक्के आणि २०२४ ते २०२५ कालावधीसाठी २.५४ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने सादर केला आहे. 
 

मागे

आर्मी डे परेडमध्ये कॅप्टन तानिया शेरगिल सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली
आर्मी डे परेडमध्ये कॅप्टन तानिया शेरगिल सर्व पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली

15 जानेवारी कोर्प्स ऑफ सिग्नल्सच्या कॅप्टन तानिया शेरगिलने पुरुष-पुरुषांच्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई गारठली; पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली 
मुंबई गारठली; पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली 

     मुंबई - नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच राज्यात थंडीला सुरुवात झाली....

Read more