By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 12:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य शासनाने महिला बचत गटांना 200 कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे.
या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटातील 1 लाख 14 हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले.
बचत गटाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याने 2014 नंतर 3 लाख 97 हजार 137 बचतगटांची निर्मिती झाली. यातील लाभार्थी कुटुंबांची संख्या 32 लाख 86 हजार 146 इतकी आहे. याच कालावधीत 26 हजार 465 समूह गट आणि 6888 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.
राज्याच्या विविध भागात काल गुरुवारी श्री गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुका....
अधिक वाचा