ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवशाही बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २४ जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 25, 2019 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवशाही बस दरीत कोसळली; दोघांचा मृत्यू, २४ जखमी

शहर : पुणे

कात्रज घाट परिसरातील शिंदेवाडी गावाजवळ सोमवारी दुपारी शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळल्याचे समजते. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, अपघातात २० प्रवाशी जखमी झाले आहेत. या सर्वांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघाताच्यावेळी बसमध्ये ४० प्रवाशी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडी या गावाजवळ असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

 

मागे

मोदी सरकार या २ केंद्रशासित प्रदेशांचं करणार विलिनीकरण
मोदी सरकार या २ केंद्रशासित प्रदेशांचं करणार विलिनीकरण

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर आणि आता मोदी सरकार ....

अधिक वाचा

पुढे  

...तर नोकरी गेल्यानंतरही मिळणार वेतन
...तर नोकरी गेल्यानंतरही मिळणार वेतन

नोकरदार वर्गाला आपली नोकरी सुरक्षित ठेवणं कठिण होतं. कर्मचाऱ्यांना अनेकदा ....

Read more