ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस उलटली, 2 महिला ठार तर 7 जण जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस उलटली, 2 महिला ठार तर 7 जण जखमी

शहर : मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर नजीक माडप बोगद्यात खाजगी बसला अपघात झाला आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराम ही घटना घडली असून यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना एमजीएम रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

कविता पलेंगे (वय 41) रा. ठाणे आणि फातिमा सालेह (89)  (ही यमन देशातील आहे) अशी मृतांची नावे आहेत

शर्मा ट्रॅव्हल्सची खाजगी स्लीपरकोच बस बंगळूरहून मुंबईकडे निघाली होती. माडप बोगद्ययात मधोमध आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली आणि बोगद्याच्या टोकापर्यंत फरफटत गेली. या बसमधून चालकासह 20 प्रवासी प्रवास करत होते. अपघातामुळे मुंबईकडे  जाणाऱ्या मार्गिकेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलीस, खालापूर पोलीस, आयआरबी पथकाने घटनास्थळी धाव घेवून अपघातग्रस् बस बाजूला केली. बोगद्यात अपघात झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते.

मागे

बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का
बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवले, राज्य सरकारचा पवारांना जोरदार धक्का

नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांच्या कारावाईने अधिकाऱ्यांना मोठा झटका,मंत्रालयातील ७०  अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुख्यमंत्र्यांच्या कारावाईने अधिकाऱ्यांना मोठा झटका,मंत्रालयातील ७० अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील ७० अधिकाऱ्यांच्या बदलीचे ....

Read more