By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 02:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - कुर्ला (पश्चिम) येथील आंबेडकरनगर परिसरातील मेहताब को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या निवासी इमारतीला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास भीषण आग लागली. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जाऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. तथापि, इमारतीमधील सिलिंडरांच्या स्फोटांमुळे ही आग वाढत होती. अखेर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
#UPDATE Mumbai: The fire that broke out due to a cylinder blast in Mehtab CHS building in Kurla West, has been brought under control. https://t.co/SilLtmsEQr
— ANI (@ANI) January 24, 2020
या दुमजली इमारतीच्या तळमजल्याला आग लागली. ही आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बघता बघता ही आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व रहिवासी इमारतीतून बाहेर आले. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. सिलेंडरांच्या स्फोटांमुळे आग अधिक भडकली. परिणामी त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या, २ शीघ्र प्रतिक्रिया वाहने, ६ जम्बो टँकर्स आणि एक पाण्याचा टँकर पोहचले. त्यांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचे अनेक तज्ज्ञ स....
अधिक वाचा