ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अवघ्या २९ व्या वर्षी मेजर केतन शर्मा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 18, 2019 05:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अवघ्या २९ व्या वर्षी मेजर केतन शर्मा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद

शहर : मुंबई

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत हौतात्म्य आलेले मेजर केतन शर्मा यांना लष्करातर्फे सलामी देण्यात आली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते. अनंतनागमध्ये अचबल भागात  सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा यांना दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलं.

मेजर शर्मा हे मूळचे मेरठचे आहेत. अवघ्या २९ व्या वर्षी या शूर अधिकाऱ्याने देशासाठी हौतात्म्य पत्करलं. चकमकीत मेजर शर्मा यांच्यासह आणखी एक मेजर रँकचा अधिकारी आणि दोन जवान जखमी झालेत. मेजर शर्मा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी दिल्लीत मेजर शर्मा यांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली.

मेजर केतन शर्मा सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. जवळपास १२ तास ही कारवाई सुरु होती. जवानांनी दहशतवाद्यांना ठार केलं होतं. शहीद मेजर यांचं पार्थिव आज दुपारी वाजता त्यांच्या घरी पोहोचलं. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

 

मागे

मॉल आणि सुपर मार्केटमध्येही मिळणार पेट्रोल - डिझेल?
मॉल आणि सुपर मार्केटमध्येही मिळणार पेट्रोल - डिझेल?

केंद्रातील मोदी सरकार लवकरच नागरिकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतं. कारण, लव....

अधिक वाचा

पुढे  

मेडीगड्डाचे लोकार्पण : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?
मेडीगड्डाचे लोकार्पण : तेलंगणाची विक्रमी कामगिरी, महाराष्ट्र कधी बोध घेणार?

येत्या २१ जून रोजी देशाच्या सिंचन नकाशावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद होणार....

Read more