ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 17, 2020 09:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना अटक

शहर : देश

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा (terror attack ) कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांकडून सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काल रात्री छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रहिवाशी असल्याचे समजते. अब्दुल लतीफ मीर आणि मोहम्मद अश्रफ अशी त्यांची नावे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना पकडण्यासाठी सराय काले खा येथील मिलेनियम पार्क परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे तिकडे आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.या घटनेनंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.

मागे

तरुणांनो सावधान ! चाळीशीच्या आतल्या ५११ जणांचा कोरोनाने मृत्यू
तरुणांनो सावधान ! चाळीशीच्या आतल्या ५११ जणांचा कोरोनाने मृत्यू

तरुणांना कोविडचा (Covid 19) धोका नाही हा समज चुकीचा ठरवणारी मुंबई महापालिकेची आक....

अधिक वाचा

पुढे  

20 आणि 21 नोव्हेंबरला शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा
20 आणि 21 नोव्हेंबरला शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे.....

Read more