By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पदावरून काढले आहे. त्यांच्या जागी आता मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ते कार्यरत असतील.
लोधीं आणि पाकची फजिती
मलिहा लोधी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा पाकिस्तानची फजिती झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा त्यांनी परराष्ट्र मंत्री असा उल्लेख केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत ट्विट केलं होतं.
तसेच यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीदरम्यान एका जखमी मुलीचा फोटो दाखवत हा काश्मीरमधील क्रुरतेचा पुरावा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्या मुलीचा तो फोटो 2014 मध्ये हेदी लेव्हीन यांनी काढल्याचे दिसून आले होते.
कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर....
अधिक वाचा