ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ममता बॅनर्जींच्या 'या' आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मिटला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 17, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ममता बॅनर्जींच्या 'या' आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मिटला

शहर : calcutta

पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांची आंदोलनकर्त्या डॉक्टरांसोबतची प्रस्तावित बैठक यशस्वी झाली आहे. पश्चिम बंगालच्या सर्व रुग्णालयात नोडल अधिकारी तैनात केले जातील असा निर्णय ममता बॅनर्जी यांनी बैठकीत घेतला आहे. उपोषण संपल्या नंतर तात्काळ डॉक्टरांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही ममता बॅनर्जींनी दिलेल्या आश्वासनावर संतुष्ट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्हाला काम करताना भीती वाटत असल्याचे डॉक्टरांनी याआधी सांगितले होते. एनआरएसच्या डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या की इतरांसाठी ते उदाहरण बनायला हवे अशी डॉक्टरांची मागणी होती. याप्रकरणी आम्ही योग्य ती पाऊले उचलल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. एनआरएस रुग्णालयात झालेल्या घटनेनंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

संपावर गेलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासनही ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. या बैठकीत आरोग्य सचिव, राज्य मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य आणि राज्याचे अधिकारी, 31 कनिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली.

मागे

मुंबईत झाड दुर्घटना : महापौरांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
मुंबईत झाड दुर्घटना : महापौरांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

शहरात वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटना निसर्गनिर्मित असल्याचे सांगून मुं....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त
राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, ही पदे....

Read more