By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावर गेलेल्या डॉक्टरांना इशारा दिला आहे. डॉक्टरांच्या संपामुळे गुरुवारी नियमित सेवेवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी सरकारी रुग्णालयांना भेट दिली. सर्व डॉक्टरांनी पुढच्या चार तासात कामावर परता असे आवाहन त्यांनी केले आहे. जे डॉक्टर असे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्या म्हणाल्या. असे न झाल्यास कनिष्ठ डॉक्टरांनी हॉस्टेल खाली करावे असेही त्या म्हणाल्या. आंदोलनकर्त्या कनिष्ठ डॉक्टरांनी कोलकाताच्या सरकारी एसएमकेम रुग्णालयात ममता बॅनर्जी यांच्यासमोर आम्हाला न्याय हवाय असे नारे लावले. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना चार तासांत कामावर रुजू होण्यास सांगितले. अन्यथा कारवाईचा इशारा त्यांनी दिला. कनिष्ठ डॉक्टरांच्या आंदोलनामागे भाजपा आणि माकपाचा हात असल्याचेही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी या इशाऱ्यानंतर एमएमकेएम हॉस्पीटलच्या आपत्कालिन विभागात उपचार सेवा सुरु केली. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात सोमवारी एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराने डॉक्टरांशी गैरवर्तन केले. त्यानंतर कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आणि सुरक्षेची मागणी केली.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील आत्मघातकी हल्ला हा पाकिस्तानच्या इशाऱ्य....
अधिक वाचा