ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने तो प्यायला सॅनिटायझर आणि....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 12, 2020 01:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉकडाऊनमध्ये दारु मिळत नसल्याने तो प्यायला सॅनिटायझर आणि....

शहर : देश

देशात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन सरकार व तज्ज्ञांनी केले आहे. पण कोयंबतूरमध्ये या सॅनिटायझरमुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. खरं तर या व्यक्तीचा मृत्यू सॅनिटायझर प्यायल्याने झाला आहे. कोयंबतूरमध्ये राहणाऱ्या या ३५ वर्षाच्या व्यक्तीने दारु न मिळाल्याने हे पाऊल उचललं आहे.

या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्याने तो अस्वस्थ झाला. यावेळी तो जेथे काम करतो त्या एजन्सीने त्याला हात स्वच्छ ठेवण्यासाठी दिलेली सॅनिटायझर तो पिऊन गेला.

यानंतर बर्नार्डची पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन गेली पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बर्नार्डचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

याआधी केरळच्या तुरूंगातील एका कैद्याने देखील सॅनिटायझर दारु समजून प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

 

मागे

देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
देशात २४ तासांत कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू

देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ९०९ ने वाढली आहे. तर ३४ लोक....

अधिक वाचा

पुढे  

सोशल मीडियावर सरसकट व्हिडिओ, मीम्स फॉरवर्ड करताय? गृहमंत्र्यांची नियमावली वाचा
सोशल मीडियावर सरसकट व्हिडिओ, मीम्स फॉरवर्ड करताय? गृहमंत्र्यांची नियमावली वाचा

जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट्स व्हॉट्सअॅप-फेसबुकसारख्....

Read more