ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रेयसीचा नवरा अचानक घरी आला, तरुणाचे अचानक-भयानक झाले

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रेयसीचा नवरा अचानक घरी आला, तरुणाचे अचानक-भयानक झाले

शहर : delhi

प्रेयसीसोबत तिच्या घरी नको त्या अवस्थेत असलेल्या तरूणाला महिलेच्या नवर्‍याने रंगेहाथ पकडलं. या नवर्‍याने दोघांना ते असलेल्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं. नवरा आपल्याला सोडणार नाही याची कल्पना त्या तरूणाला आली होती, यामुळे जीव वाचवण्यासाठी या तरुणाने 5व्या मजल्यावरून उडी मारली आहे. चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटणारी ही घटना दक्षिण दिल्लीतील जे.जे.कॉलनीमध्ये घडली आहे.
पंकज (वय 29 वर्ष) याचं एका विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध होतं. मंगळवारी ही महिला एकटी असताना पंकज तिच्या घरी गेला होता. हे दोघे बेडरूममध्ये असताना महिलेचा नवरा घरी आला. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडताच त्याला आपली बायको दुसर्‍यासोबत असल्याचं दिसल्याने तो जबरदस्त हादरला. त्याने बायकोच्या कानाखाली मारली.आपलं काही खरं नाही हे कळाल्याने महिलेने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. ही महिला टोकाचं पाऊल घेत असल्याचं पाहून पंकज आणि तिचा नवरा दोघेही तिच्याकडे धावले. आपली बायको नाटक करतेय हे कळाल्याने नवर्‍याने पंकज आणि त्याच्या बायकोला खोलीत बंद करून ठेवलं. तुझ्या बापाला आणि भावाला बोलावतो असं म्हणत महिलेचा नवरा जोरजोरात ओरडत होता. पंकज आणि महिलेने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना दरवाजा उघडता आला नाही.
आपला जीव वाचवण्यासाठी पंकजने बाल्कनीतून पाचव्या मजल्यावर जाण्याचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर त्याला समोरच प्रेयसीचा नवरा बसलेला दिसला. यामुळे घाबरलेल्या पंकजने पाचव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गेली दोन वर्ष पंकज आणि या महिलेमध्ये संबंध होते असं पोलीस तपासात कळालं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मागे

जम्मू - काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद 
जम्मू - काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद 

काश्मीरच्या दलीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकी....

अधिक वाचा

पुढे  

सौदीच्या तेल पाईपलाईनवर ड्रोन हल्ला
सौदीच्या तेल पाईपलाईनवर ड्रोन हल्ला

सौदी अरेबियाच्या तेल पाईप लाईनवर मंगळवारी ड्रोन द्वारे हल्ला करण्यात आल्य....

Read more