ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारला

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 31, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारला

शहर : देश

        लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद क्षण असून मनोज नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस भारतीय लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत.

     जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपीन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल  नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.


      लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरवणे हे सेवा ज्येष्ठतेनुसार लष्कर प्रमुखपदाच्या स्पर्धेतील प्रमुख दावेदार होते. जगातील बलाढय़ लष्करांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्करात १३ लाख अधिकारी-जवानांचा फौजफाटा आहे. लष्करप्रमुख म्हणून नेतृत्व करताना त्यांना ३७ वर्षातील सेवेचा अनुभव कामी येईल.

कोण आहेत मनोज मुकुंद नरवणे ?
          नरवणे हे मूळचे पुण्याचे. त्यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण करून ते जून १९८० मध्ये लष्करात दाखल झाले. शीख लाईट इन्फ्रंट्रीमधून त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लष्कराच्या विविध विभागांत पुढे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 


          जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महुस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा आजवर अनेक पदांची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. दहशतवाद, फुटीरतावाद विरोधातील कारवायांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.


          नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीदेखील आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग. लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली.
 

मागे

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती
'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती

        नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर लष्करप्रमु....

अधिक वाचा

पुढे  

इंटरनेट बंदीच्या फटाक्यामुळे २१००० कोटींचे नुकसान
इंटरनेट बंदीच्या फटाक्यामुळे २१००० कोटींचे नुकसान

            अलिकडच्या काळात देशात कुठेही आंदोलनांनी जोर धरला की, सरकार....

Read more