ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मनोज नरवणे हे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 08:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मनोज नरवणे हे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त

शहर : पुणे

            पुणे - आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरवणे यांचे पूत्र मूळचे पुणेकर असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची देशाच्या लष्कर प्रमुख पदी नियुक्ती होणार आहे. जनरल नरवणे पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. 


           पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये आनंदोत्सव साजरा होतो संस्थेचे माजी विद्यार्थी मनोज नरवणे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त झाल्याचा आनंद इथल्या सगळ्यांनाच वाटतो आहे. ज्ञानप्रबोधिनीतून पास आउट झालेल्या नरवणे यांनी पुण्यातील एनडीए तसेच डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतून लष्करी प्रशिक्षण घेतलं.


          अनेक मोहिमांमध्ये त्यांनी आपलं शौर्य तसेच नेतृत्व सिद्ध केलं. आता 31 डिसेंबर रोजी ते लष्कर प्रमुखपदाची सूत्र हाती घेणार आहेत. राष्ट्रभक्ती तसंच राष्ट्र सेवेची कास धरणारी पिढी घडविण्याचं काम ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.


          इथल्या माजी विद्यार्थ्यांसाठी देखील ही बाब अभिमानास्पद अशी आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर लष्कर प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे नरवणे हे दुसरे मराठी अधिकारी ठरता आहेत. याचा सार्थ अभिमान ज्ञानप्रबोधिनी संस्थेला आहे.
 

मागे

लंकाबाईंच्या 21 व्या प्रसुतीत जन्मलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू
लंकाबाईंच्या 21 व्या प्रसुतीत जन्मलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू

            बीड - राज्यात आरोग्य खात्याच्या दुर्लक्षामुळे अनेक लेकरांच....

अधिक वाचा

पुढे  

नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांची एक्झिट
नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांची एक्झिट

            पुणे - अभिनयसृष्टी आणि सामाजीक क्षेत्रामध्ये पाच दशकांहून ....

Read more