By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 10:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत तसेच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलच्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पॅसेंजर ट्रेन 21 मार्चला रात्री 11 वाजल्यापासून 22 मार्च पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी 22 मार्चला पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहतील. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल रेल्वेबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार विभागीय रेल्वे खात्याला दिले आहेत. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या दिवशी किती लोकल रेल्वे सोडायच्या यावर अंतिम निर्णय विभागीय रेल्वे विभागच घेणार आहे.
मुबई लोकल रेल्वे प्रशासनाकडे जनता कर्फ्यूच्या दिवशीच्या नियोजनाची विचारणा केली असता त्यांनी रविवारी तशा 80 टक्के गाड्या बंद असल्याचं सांगितलं. तसेच आणखी रेल्वे गाड्या रद्द करण्याची आवश्यकता असल्यास त्यावरही लवकरच निर्णय घेऊ, असंही सांगण्यात आलं आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असं वारंवार आवाहन केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध आणण्याची मागणी होत आहे. त्यावर सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, रविवारी (20 मार्च) जनता कर्फ्यूच्या दिवशी किमान वाहतूक बंद ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचं या निर्णयातून दिसत आहे. या निर्णयानंतर जनता कर्फ्यूला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहावं लागणार आहे.
विदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांना 14 दिवस म्हणजेच दोन आठवडे घरातच राहण्....
अधिक वाचा