By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सर्वोच्च न्यायालयातही मराठा मोर्चाचा विजय झाला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला. दोन आठवड्यात या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यासाठी महाराष्ट्र सरकारला नोटिस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अग्निपरीक्षेत सध्यातरी महाराष्ट्र सरकार पास झाले आहे. मात्र पूर्वलक्षी पराभवाने मराठा आरक्षण लागू करण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्चा न्यायालयाने फेटाळली. राज्य सरकारने 2014 पासून मराठा आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती ती अमान्य झाली असली तरी तूर्तास मराठा आरक्षण कायम राहिले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 27 जुन रोजी शिक्कामोर्तब करीत मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि नोकरीत 13 टक्के आरक्षण दिल होत. मात्र डॉक्टर जयश्री पाटील यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुणरत्ने सदावर्ते मराठा आरक्षणाच्या विरोधात युक्तिवाद करीत आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2013 ते 2019 या पाच वर्षात गटारे, मॅनहोल ....
अधिक वाचा