By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यानं चंद्रकांत पाटलांना फोनवरून आत्महत्येची धमकी दिली. वैद्यकीय पदव्युत्तर आरक्षणासाठी तात्याराव लहानेंसह मराठा मोर्चाचे नेते आणि विद्यार्थ्याच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थान गाठलं आहे. चंद्रकांत पाटलांनीही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार न्याय देणार आहे. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकेल. तर उर्वरीत 100 विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला देतील त्यामुळे सरकार या विद्यर्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गवारीत (एसईबीसी) 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षीपासून करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला होता. वैद्यकीय पदव्युत्तर कोर्सची प्रवेश प्रक्रिया लागू झाल्यानंतर आरक्षण लागू केल्याचे हायकोर्टाने म्हटलं होतं.
औरंगाबादमधील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही ठेवेदार पुढे येईना अशी अवस....
अधिक वाचा