ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 06:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

शहर : बीड

राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा येत्या 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय मराठा आरक्षणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात परळीत मराठा क्रांती रोखठोक मोर्चाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यात यावी यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीला परळी तालुक्यातील सर्वच समन्वयक उपस्थित आहेत.

राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे सरकारने वेळ वाया घालवू नये. अन्यथा 11 ऑक्टोबरपासून सरकार विरोधात आरक्षणाची मोहिम तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.

मागे

आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा, काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
आंध्रप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा लागू करावा, काँग्रेस नेत्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात दिशा कायदा पारित करावा,” अशी मा....

अधिक वाचा

पुढे  

जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन
जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण होण्याचं अनुमान : डॉ हर्षवर्धन

देशात कोरोनाचं संकट वाढत असताना कोरोनावर लसीच्या संदर्भात महत्वाची माहित....

Read more