ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा समाजाचे 2 ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 27, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा समाजाचे 2 ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन

शहर : नाशिक

सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्य स्तरीय बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक ठरव करण्यात आले. त्यात 2 ऑक्टोबरला राज्य भरातील सर्व आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यात विभागानुसार सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगती मिळाल्यानंतर राज्यभर मराठा समाजाकडून आंदोलन आणि जिल्हा पातळीवर बैठक पार पडत आहे. या आंदोलनाला निर्णायक वळण देण्यासाठी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची राज्य स्तरीय बैठक पार पडली. यात छत्रपती संभाजीराजे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विचारवंत उपस्थित होते. राज्य सरकार समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरल असल्याची टीका करण्यात आली असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित येवून मराठा समाजाच्या आरक्षणसांदर्भात न्यायालयात बाजू मंडण्याची मागणी करण्यात आली.यावेळी बोलताना छत्रपती संभाजी राजे यांनी आपापसातील गटबाजी विसरून एक दिलाने समजासाठी एकत्र येण्याचे सर्वाना आवाहन केल. आजच्या बैठकीला याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासह इतरांनी यायल पाहिजे होते असे मत व्यक्त केले कोल्हापूर आणि सातारा छत्रपती एकच आहे यात काही नेते भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना ठोकून काढा असा इशाराही त्यांनी दिला. सरकरने सार्थ संस्थेला केवळ 130 कोटी दिलेत त्याने काही होणार कमीत कमी एक हजार कोटी निधी देण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्यात म्हणून मी केवळ मराठाच्या नाही मी बहुजन समाजाचा ही आहे. मराठा आणि बहुजन एकत्र आणण्यासाठी राज्यभर दौरे करत आहे.

सकल मराठा मोर्चाच्या बैठकीत काही ठराव मंडण्यात आले

आर्थिक निकषांवर आरक्षण नको.

आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यात कुठलीही भरती राज्य सरकारने करू नये.

5 ते 10 तारखे दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने विभागनुसार आंदोलन करावे.

सारथी संस्थेला 1 हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा.

2 ऑक्टोबरला आमदार खासदार यांच्या घरावर धरणे आंदोलन होणार.

मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने पंतप्रधान राष्ट्पतींना पत्र लिहावे.

मराठा समाजाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले. आरक्षणासाठी सरकारने पावले उचलावे.

अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी.

मराठा समाजातील तरुणावर जे गुन्हे दाखल झाले. ते केंद्र आणि राज्य सरकारने मागे घ्यावे.

 

मागे

तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल!
तब्बल 6 महिन्यांनी सुरु होतेय लेडीज स्पेशल!

पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक सेवेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आ....

अधिक वाचा

पुढे  

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचं वयाच्या 82 व्य....

Read more