By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 08:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद पार पडली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केला.
“मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश उठवण्यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्य सरकारनं हे करावं. महाविकासआघाडी सरकार आमच्या बाबतीत दुजाभाव करतं आहे. मुंबईत डान्सबारच्या बाबतीत चार वेळा अध्यादेश काढले, तर मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत का नाही,” असा सवालही राजेंद्र कोंढरे यांनी उपस्थितीत केला.
“मराठा समाजाच्या आरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी मुख्य न्यायाधिशांना राज्य सरकारनं विनंती करावी. ही स्थगिती उठवणं ही आमची पहिली मागणी आहे. ही स्थगिती मिळताच राज्य सरकारनं त्वरीत नवीन आदेश काढत आरक्षणात मिळालेल्या गोष्टी थांबवण्यात आल्याच कळतं आहे,” असेही राजेंद्र कोंढरे म्हणाले.
“अनेक मंत्री हे मराठा समाजासोबत दुजाभाव ठेवतात. लोकांना आता हे लक्षात आलंय की मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीत अडथळा आणायच काम होतं आहे. मग आता निदर्शन कशी थांबवायची? ॲडमिशनच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार की नाही?” असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केले.
“आम्हाला अतिरिक्त फायदा देऊ नका. पण आमच्यावर अन्याय होता कामा नये. विद्यार्थ्यांना दिलासा मिळणं हे खूप महत्वाचं आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.“येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यात विविध क्षेत्रातली सर्व तज्ञ मंडळी एकत्र येतील. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार आहे. तसेच येत्या 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार आहेत.”
नागपुरात कोरोनाचा तांडव सुरु आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही ....
अधिक वाचा