ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 05:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

शहर : मुंबई

'कांद्याचे भाव वाढले आहेत तर ओरड होत आहे. पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार याचा विचार कोणी करत नाही. शेतमाल आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आयात केलेला कांदा जेएनपिटी बंदरात उतरवू देणार नाही. राज्याभरात शेतकरी रस्त्यावर उतरू आणि आयात केलेला कांदा विकू देणार नाही,' असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने कांदा प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'सरकारचा कांदा आयात करण्याचा विचार आहे. 15 दिवसात कांदा आयात केला जाईल आणि त्याच दरम्यान आपल्या शेतातील कांदा बाजारात येणार आहे. यामुळे भाव घसरले तर शेतकऱ्याचं नुकसान होईल,' असं म्हणत सरकारकडून होणाऱ्या कांदा आयात निर्णयाविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चा चा सरकारला इशारा

'परदेशी कांद्याची होणारी आयात शेतकऱ्यांसाठी घातक आहे. जानेवारीत परदेशी कांदा राज्यात आल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कोण देणार? राज्यात नवे कांदा उत्पादन येणार असताना सरकार कांदा आयात का करू पाहते? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. परदेशी आयात कांदा विकू देणार नाही,' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.दरम्यान, दररोजच्या जेवणात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्यांचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. काद्यांने शंभरी पार केल्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे जेवणातून कांदाच बाहेर गेलाय. या कांद्याच्या दरात आणखी 3 महिने कोणतीही घट होण्याची सूतराम शक्यता नाही, देशभरातल्या कांदा उत्पादक भागात सलग महिनाभर झालेल्या अतिवृष्टीनं खरीप कांद्याचं मोठं नुकसान झालंय. रब्बी कांद्याचा साठा संपत आलाय, नवा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला आणखी 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच कांद्याच्या दरात दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. कांद्यावरील स्टॉक लिमिट किंवा कांदा आयात करुन देशातली गरज पूर्ण होणार नाही अशी माहिती कांदा बाजाराचे विश्लेषक दिपक चव्हाण यांनी दिली आहे.

मागे

2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट
2020मध्ये असणार इतक्या सुट्ट्या, प्लॅन करण्याआधी पाहा लिस्ट

येत्या काही दिवसातच 2019 वर्ष संपणार आहे. 2020च्या स्वागताची तयारी देखील सुरु के....

अधिक वाचा

पुढे  

उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...
उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर 'पेट्रोल' ओतले आणि...

देशभर उन्नाव आणि हैदराबाद बलात्कार प्रकरणी रोष असताना दिल्लीत एक अजब घटना ....

Read more