ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आरक्षण, ११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 11:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आरक्षण, ११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल

शहर : मुंबई

उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यामुळे ११ वीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. मराठा विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात अर्ज करता येण्यासाठी जुलैपर्यंतची मुदत करण्यात आली आहे. तर पहिली गुणवत्ता यादी १२ जुलैला लागणार आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे निवेदन विधानसभेत केलंमराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गात अर्ज करता यावेत यासाठी वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार SEBC आणि EWS विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांमध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर जुलैला जाहीर होरी पहिली गुणवत्ता यादी आता १२ जुलैला जाहीर होणार आहे.अकरावीत SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी १२ टक्क्यांप्रमाणे ३४ हजार २५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रवर्गात केवळ हजार ३५७ अर्ज आले आहेत.

 

मागे

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. शन....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

शुक्रवारी सकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. पावसाने उसंत घेतलेली ....

Read more