By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2020 09:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
मराठा समाजाशी (Maratha Reservation) संबंधित दोन मोठ्या बातम्या आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat Election) धुरळा उडाला असून आता संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) त्यात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली. तर सकल मराठा समाज आणि मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांना राज्यव्यापी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे.
संभाजी ब्रिगेड संघटना ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
संभाजी ब्रिगेडचं राज्यात जाळं
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराने चांगली मतं घेतली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा आत्मविश्वास दुणावला असून सर्वच ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची तयारी संघटनेने केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं राज्यात मोठं जाळं आहे. त्यामुळे या संघटनेचे किती उमेदवार निवडून येणार, संभाजी ब्रिगेड फॅक्टरचा फायदा कोणाला होणार? याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निमंत्रण दिलं आहे. उदयनराजेंना तलवार देऊन राज्यव्यापी बैठकाचे निमंत्रण दिले.
उदयनराजेंना तलवार भेट
सकल मराठा समाज, मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली. मराठा क्रांती मोर्चाच्या पुढच्या वाटचालीचे नियोजन करण्यासाठी मुंबईत होणाऱ्या राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रण दिले. ही राज्यव्यापी बैठक 20 डिसेंबर रोजी वडाळा येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सहकार नगर येथे होणार आहे. (Sambhaji Brigade Udayanraje Bhosle)
उदयनराजेंकडून उपस्थितीचं आश्वासन
साताऱ्यातील भेटीवेळी समन्वय समितीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना तलवार भेट देण्यात आली. उदयनराजे यांनी बैठकीला उपस्थित राहू, असे आश्वासन या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
“अन्य समाजाच्या आमदार-खासदारांचीही जबाबदारी”
मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळे अन्य समाजाच्या आमदार-खासदारांचीही जबाबदारी असून त्यांनीसुद्धा मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. कुठलीही परीक्षा घ्याल, तेव्हा मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या, अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी काही दिवसांपूर्वी केली होती.
पिवळं, केशरी आणि पांढऱ्या रंगाचं तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डसारखं होण....
अधिक वाचा