ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आरक्षण ११ जजेसच्या घटनापीठाकडे पाठवा; राज्य सरकारची मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2020 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आरक्षण ११ जजेसच्या घटनापीठाकडे पाठवा; राज्य सरकारची मागणी

शहर : देश

मराठा आरक्षण प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केलीय. इंदिरा साहनी प्रकरणाचा निकाल जजेसच्या घटनापीठानं दिलाय. त्याच निकालावर मराठा आरक्षण तपासून पाहिले जातेय. अशावेळी इंदिरा साहनी प्रकरणातील जजेस पेक्षा जास्त जजेसकडे मराठा आरक्षण प्रकरण द्यावे लागणार आहे. त्या शिवाय इंदिरा साहनी केस १९३१ च्या जनगणनेवर आधारीत आहे. मात्र आत्ताची आर्थिक, समाजिक आणि शैक्षणिक परिस्थीती बदलली आहे. त्यामुळे ११ जजेस घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात केलीय. ही मागणी करताना महाराष्ट्र सरकारचे वकील कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत.

मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबतच्या अर्जांवर आज सुनावणी झाली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा अर्ज राज्य सरकारने जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात केला आहे. हीच मागणी करणारा अर्ज या प्रकरणातील इतर 9 हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनीही केला आहे. राज्य सरकारच्या आणि इतर 9 याचिकाकर्त्यांच्या या अर्जांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज झालेल्या मराठा आरक्षण सुनावणीत घटनापीठाकडे वर्ग करण्याचे प्रयत्न आज झाले. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

- मराठा आरक्षण प्रकरण ११ जजेस घटनापीठाकडे वर्ग करावे.

- महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी

- इंदिरा साहनी केस पेक्षा जास्त जजेसच्या खंडपीठाकडे वर्ग करावे.

- २०११ च्या जनगणनेनुसार सद्यस्थिती बदलली आहे.

खंडपीठासमोर असा मांडला गेला व्यक्तीवाद -        

इंदिरा साहनी केसमध्ये न्यायाधीशांच्या घटनापाठानं आरक्षण सीमा मर्यादा दिली आहे. परंतु आता १०३ व्या दुरुस्तीमुळे न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेली कमाल मर्यादा कालानुरूप राहत नाही. त्यामुळे हे प्रकरण घटनापीठाकडे गेले पाहिजे. १५ () आणि १६ () हे १५ () आणि १६ () चे उल्लंघन करतेय का हे पहावं लागेल, मुकूल रोहतगी म्हणाले. अनुच्छेद 342 () मध्ये राज्याला कोणतेही आरक्षण देण्याची क्षमता आहे की नाही? हा प्रश्न प्रथमच उपस्थित होत आहे, असा दुसरा मुद्दाही रोहतगी यांनी मांडला. या केसमुळे मंडल कमिशन पासूनची सर्व प्रकरणे पुन्हा एकदा नव्याने पहावे लागतील, असंही रोहतगी म्हणाले.

जर आर्टीकल 15 आणि 16 मूलभूत रचनेचा भाग असतील आणि ते कलम 338 आणि 342 मध्ये क्लॅशेस होत असतील तर नंतरचे आर्टिकल टिकतील का? हा प्रश्न आहे. हे घटनात्मक मुद्दे असल्याचंही रोहतगी म्हणाले.

 

 

 

मागे

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आह....

अधिक वाचा

पुढे  

केवळ पहिली पत्नी पतीनिधनानंतर भरपाईस पात्र, मात्र दोन्ही विवाहातील अपत्यांना लाभ हायकोर्टाचा निर्णय
केवळ पहिली पत्नी पतीनिधनानंतर भरपाईस पात्र, मात्र दोन्ही विवाहातील अपत्यांना लाभ हायकोर्टाचा निर्णय

एखाद्या पुरुषाला दोन पत्नी असतील आणि दोघीही त्याच्या पश्चात मिळणाऱ्या भरप....

Read more