By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : tuljapur
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरूवात होत आहे. राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. तुळजापुरातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वात पन्नास हजाराहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
मागण्या काय आहेत?
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारने या परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. तेव्हा जिथे जिथे या परीक्षा घेतल्या जातील, तिथे तिथे गनिमी काव्याने जाऊन त्या उधळण्याचे नियोजन मराठा क्रांती ठोक मोर्चानं केले आहे.
गेल्या महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठोक मोर्चाच्या वतीने राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलन सुरु केलंय.
सदावर्तेंना ठोकू, सत्तारांना फिरू देणार नाही!
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि त्या विरोधात याचिका दाखल केलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून अपशब्द वापरले जात आहेत.या सदावर्तेंना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे राज्यमंत्री यांनी मराठा तरुणाला केलेल्या अर्वाच्च शिवीगाळीचा जाब देखील आम्ही अब्दुल सत्तार यांना विचारणार आहोत. सत्तार यांच्या या वक्तव्याबद्दल शिवसेनेने त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, तसेच सत्तार यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना महाराष्ट्रात तर फिरू देणार नाहीच अशी मोर्चेकऱ्यांची भूमिका आहे.
उद्याच्या महाराष्ट्र बंदला स्थगिती
मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंद मागे घेण्याबाबत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. या संदर्भात काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सांगितलं की, रात्री उशीरा बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत आहोत.
मराठीत बोलण्याची विनंती केल्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाविरोधा....
अधिक वाचा