By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2024 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जालना
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येऊ नये, यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेण्यात आली. पण सगे सॊयरे शब्दावरुन सगळ अडलं आहे. त्यावर तोडगा निघण गरजेच आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील हे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. येत्या 20 जानेवारीला ते जालना अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी जे मुद्दे मांडलेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मांडलेल्या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही समाधान झालेलं नाही. सोयरे या शब्दावरुन सगळ अडलं आहे. “सोयरे संदर्भात आम्ही दोन महिने झाले, व्याख्या देतोय पण ते फक्त त्यामधील एक शब्द घेतात. व्याख्येसह सगे सोयरे शब्द घेतला पाहिजे” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे आणि हे प्रमाणपत्र मराठ्यांजवळ असेल, तरच त्या सग्या सोयऱ्याला शब्दाला किंमत आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मुंबईला जातांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी आणि जेवणाचे स्टॉल लावा. ज्यांची नोंद सापडली त्या नोंदीचा आधार घेऊनच, ज्या ठिकाणी आपली लग्न सोयरीक जुळते ते सगे सॊयरे आणि त्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे” अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काय ठणकावून सांगितलं?
“सर्व सग्या सोयऱ्यांना शब्द वापरून ज्याची नोंद सापडली त्या बांधवांचा आधार घेऊन, ज्याची नोंद सापडली नाही, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा ही व्याख्या घेणे आवश्यक आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठा समाजाला आवाहन आहे, की मुंबईला जाताना रॅली मध्ये शांतपणे यावे आणि ज्यांना स्वयंसेवक व्हायचे आहे, त्यांनी 20 जानेवारीला अंतरवालीला यायचे आहे. 20 जानेवारी बद्दल कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. आरक्षण मिळाले, तरी मुंबई जाणार आहोत आणि नाही मिळाले तरी मुंबईला जाणार आहोत. आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ आणि नाही मिळाले तर आरक्षण आणायला जाऊ” असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीप....
अधिक वाचा