By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्र सरकारने विजय दिनाचं आचौत्य साधत पुढच्या भारतीय सैन्यदलप्रमुखाची निवड केली आहे. या महत्वाच्या पदावर एका मराठी सैन्य अधिकाऱ्याची निवड झाली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे असं या मराठी अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनलर बिपीन रावत यांची 31 डिसेंबर 2019 रोजी मुदत संपत आहे. त्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाची कमान सांभाळतील.
लेफ्टनंट जनरल नरवणे सध्या आर्मी स्टाफचे उपप्रमुख म्हणून काम करत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे ते 28 वे लष्करप्रमुख ठरणार आहेत. नरवणे यांच्या निवडीसह आता हवाईदल, नौदल आणि भूदल अशा तिन्ही दलाच्या प्रमुखपदी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 56 व्या बॅचचे अधिकारी विराजमान होतील.
मनोज नरवणे 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुखपदाची शपथ घेतील. नरवणे यांची नियुक्ती अशावेळी होत आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण स्थिती आहे. पाकिस्तानकडून वारंवार प्रक्षोभक कृती होत असल्याचा आरोप होत आहे. नरवणे शिख लाईट इन्फंट्रीचे अधिकारी असून त्यांची दिल्लीत नियुक्ती होण्याआधी त्यांनी इस्टर्न कमांड प्रमुख म्हणून कोलकाता येथे काम केले. पूर्वेकडील सीमेवर झालेल्या अनेक मोहिमांमागे नरवणे असल्याचंही सांगितलं जात आहे.
1980 मध्ये मनोज नरवणे 7 व्या शिख लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले. काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये घुसखोरीविरोधात लढण्याचा मोठा अनुभव नरवणे यांच्याकडे आहे. त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल बटालियनच्या प्रमुखपदाची जबाबदारी पार पाडली. तसेच आसाम रायफल्समध्ये त्यांनी मेजर जनरल पदावर महानिरिक्षक म्हणूनही काम केलं.
या वर्षाचे शेवटेचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर 2019 रोजी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर....
अधिक वाचा