By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : nanded-Waghala
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना वेतनचं दिलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून शासनाने या ठिकाणच्या डॉक्टरांना वेतन न दिल्याने त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. वेतन न मिळालेल्या डॉक्टरांची संख्या ही 1200 पेक्षा जास्त आहे.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना वॉर्डात जीवाची बाजी लावून डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे. या बाधित रुग्णांचा जीव वाचावा ते लवकर बरे व्हावेत म्हणून काम करत आहेत. या डॉक्टरांना सरकारने कोरोना योद्धे अशी पदवी दिली. त्यासोबत 10 हजारांची वाढ देण्याचा निर्णय देखील घेतला.
पण पगार वाढ मिळणे तर दूरच त्यांचे मूळ वेतन देखील गेल्या 2 महिन्यांपासून शासनाने दिलेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात निवासी डॉक्टरांना 53 हजार तर इंटर्न डॉक्टरांना सुमारे 11 हजार रुपये प्रति महिना मिळतात. पण ऐन कोरोना काळात जनसेवा करूनही 2 महिन्यांपासून हे वेतन थकलेले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांची मुख्य धुरा ही निवासी डॉक्टरांकडे असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या रुग्णांवर निवासी डॉक्टरच प्रामुख्याने उपचार करतात. या निवासी आणि इंटर्न डॉक्टरांच्या पगाराचा मुद्दा महत्वाचा आहे. पण शासनाकडूनच यासाठी पैसे उपलब्ध झाला नाही. येत्या तीन-चार दिवसात शासनाकडून यासाठी निधी मिळेल असा त्यांना विश्वास आहे. पण मागील 2 महिन्यांपासून अधिष्ठाता निवासी डॉक्टरांना हेच उत्तर देत आहे.
कोरोनाकाळात शासन जनतेची खूप काळजी घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अनेक सत्ताधारी नेते सांगत आहेत. पण मराठवाड्यातील निवासी डॉक्टरांच्या पगाराची कहाणी ऐकल्यावर खरंच शासन लक्ष देत का याची शंका उपस्थित होत आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोनाकाळातही मराठवाड्यावर अन्याय होतो की काय असा आरोप होत आहे. ज्या विभागाने महाराष्ट्राला आरोग्य मंत्री दिले, त्याच विभागातील कोरोना डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दरवर्षी जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. तथाप....
अधिक वाचा