By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2020 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी संस्कृतीत मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी, गीता जयंती हे सण साजरे केले जात असून प्रामुख्याने गुरुवारचे व्रत महत्त्वाचे असते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीषातल्या चारही गुरूवारी व्रत करून घरात सुख, समृद्धी नांदावी यासाठी विशेष प्रार्थना केली जाते. तसेच शेवटच्या गुरूवारी महिलांना, कुमारिकांना, तरूणींना घरी आमंत्रण देऊन हळदी कुंकू व वाण देऊन या व्रताची दरवर्षी सांगता करण्याची प्रथा आहे.
15 डिसेंबर 2020 पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली असून या मार्गशीर्ष गुरूवार निमित्त केल्या जाणार्या महालक्ष्मी व्रताची सुरूवात 17 डिसेंबर पासून होणार असून सांगता 7 जानेवारी 2021 मध्ये होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याची सांगता 13 जानेवारी दिवशी होणार आहे.
मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रत 2020 तारखा
पहिला गुरूवार - 17 डिसेंबर
दुसरा गुरूवार - 24 डिसेंबर
तिसरा गुरूवार - 31 डिसेंबर
चौथा गुरूवार - 7 जानेवारी
पूजा विधी
पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.
चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद-कुंकू वाहावे.
पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा.
कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.
तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा.
कलश चक्राकारावर ठेवावा.
समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.
फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा.
देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी.
श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी.
मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.
संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.
गायीसाठी एक पान वेगळं काढावे.
नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.
दुसर्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे.
पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.
शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.
देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्ह....
अधिक वाचा