By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मरीन ड्राइव जवळ समुद्रात शनिवारी दुपारी बुडालेल्या साहिल खान या 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला. जी.टी।. रुग्णालयात शवविछेदणा नंतर साहिल चा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की नागपाड्यातील महानगरपालिकेच्या शाळेतील आठवीत शिकणारा साहिल खान शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत मरीन ड्राइव येथे समुद्रकिनारी फिरायला गेला . त्याचवेळी उसळणार्या लाटेसोबत तो समुद्रात ओढला गेला. त्याला वाचविण्यासाठी 26 वर्षाच्या जावेद खान याने समुद्रात उडी टाकली. मात्र तोही बुडाला या घटनेचे वृत कळताच पोलिस आणि नौदलाचे जवान घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. शनिवारी संध्याकाळी सव्वा तासच्या सुमारास जावेदचा मृतदेह सापडला. समुद्राला भारती असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता. रविवारी सकाळी पुन्हा बचाव कार्याला सुरवात झाली अखेर दुपारी पावणे दोनच्या सुमारास मत्स्यालयाजवळ साहिलच्या मृतदेह सापडला , अशी माहिती पोलिसांनी दिली.
पचगाव शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी ट्रॅवल बसने दिलेल्या ....
अधिक वाचा