ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा धसका, कोल्हापुरात शिंकणाऱ्या बाईकस्वाराची दाम्पत्याकडून धुलाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा धसका, कोल्हापुरात शिंकणाऱ्या बाईकस्वाराची दाम्पत्याकडून धुलाई

शहर : कोल्हापूर

कोरोना विषाणूने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. याच दरम्यान कोल्हापुरात एकजण दुचाकीवरुन जाताना शिंकल्याने एका दाम्पत्याने दुचाकीस्वाराची धुलाई केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कोल्हापुरातील गुजरी गल्लीत ही घटना घडली. एक दाम्पत्य दुचाकीवरुन जात असताना अचानक बाजूला असलेला दुचाकीस्वार शिंकला. त्यामुळे रागात दाम्पत्याने दुचाकीस्वाराला मारहाण केली. या घटनेमुळे रस्त्यावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने भारतातही शिरकाव केला आहे. त्यासोबत महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकजण या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क किंना तोंडाला रुमाल बांधून फिरत आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 45 वर पोहोचला आहे. तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 166 झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून हा आजार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तर लोकांना घरा बाहेर पडणे टाळा असेही राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

मागे

नागपुरात 'कोरोना इफेक्ट', चहा टपरी ते दारुची दुकानं बंद, एसटीत एका सीटवर एक प्रवासी
नागपुरात 'कोरोना इफेक्ट', चहा टपरी ते दारुची दुकानं बंद, एसटीत एका सीटवर एक प्रवासी

मुंबई आणि पुण्यानंतर सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या नागपूरमध्येही ‘कोरोना इफ....

अधिक वाचा

पुढे  

भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध
भारतात 62 लॅब, 106 सॅम्पल कलेक्शन केंद्र, गुगल मॅपवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध

कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 62 लॅब आणि 106 सॅम्पल कलेक्श....

Read more