By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 05, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या एका महिला पर्यटकाचा बेल्व्हीडियर पॉईंटवरून कोसळून मृत्यू झाला आहे. गीता मिश्रा असे या महिलेचे नाव असून त्या मुंबईच्या आहेत. पती व दोन मुलींसह त्या माथेरानला फिरायला आल्या होत्या. बेल्व्हीडियर पॉईंट येथे दगडाची ठेच लागल्याने त्यांचा तोल गेला व त्या आठशे फूट दरीत कोसळल्या. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती व लहान दोन मुली व एक मित्र होता. दरम्यान, स्थानिक पोलीस व माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गीता यांचा मृतदेह वर आणला.
सुट्ट्यांच्या काळात खासगी बसने गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला कात....
अधिक वाचा