By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
संपूर्ण देशभर गाजलेल्या नेवाळी आंदोलन समितीचे अध्यक्ष मथुर म्हात्रे यांचे कल्याण मधील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाणे नेवाळी, रायगड, पालघर जिल्ह्यातील आगरी कोळी समाजामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे.
भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि मथुर म्हात्रे यांनी नेवाळीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी अनेक आंदोलने केली. ठाणे जिल्हा ग्रामीण भागात भाजपचा प्रचार करण्यात म्हात्रे यांचा मोलाचा वाटा होता. नेवाळी आंदोलन समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यापासून त्यांनी संरक्षण मंत्र्यांपासून ते न्यायालयीन लढाई लढण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कामगिरीबद्दल ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी संघटनांकडून त्यांचा अनेक वेळा करण्यात आला. तीन वर्षापूर्वी झालेल्या नेवाळी आंदोलनानंतर त्यांनी शेतकर्यांची बाजू सरकारपर्यंत मांडण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली होती. मात्र नेवाळी मधील शेतकऱ्यावर दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याची त्यांची मागणी अपूर्णच राहिली.
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या भारताच्या चंद्रयान 2 ने आज सकाळी 9.30 वाजत....
अधिक वाचा