By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2020 01:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणारं अनुदान राज्य शासनाने आणि महापालिकेने बंद करावं. अशी मागणी करणारं पत्र शिवसेना नगरसेवकांनी विभागप्रमुख आणि महापौर यांच्या नावे लिहावं, असं जाहीर विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसत आहे.
बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज (9 ऑगस्ट) लालबाग येथे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
“कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या, तर जे कर्नाटक लोक आहेत त्यांना समजेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत”, असेही पेडणेकर म्हणाल्या (Mayor Kishori Pednekar).
राज्यात कोल्हापूरसह सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलनं होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
नागरिक आणि प्रशासन साथीरोगाचा सामना करत असताना कोरोना रुग्णांकडून अतिरिक....
अधिक वाचा