By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 01, 2019 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अजब दावा रविवारी रात्री पासूनच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आणि वाहतूक कोंडीही झाली तर काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचून तिन्ही मार्गावर लोकल गाड्या 15 20 मीनटे उशीरा धावत होत्या. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेले दावे फोल ठरल्याचे स्पस्थ झाले परंतु या पावसात कुठेही पाणी तुंबले नाही, असा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
या पावसामुळे हिंदमाता ,किंग सर्कल हे परिसर नेहमीप्रमाणे जलमय झाले होते. सायनचे गांधी मार्केट, कुर्ला, सांताक्रूझ आदि भागात पाणी तुंबल्याने कुर्ला बस डेपो ते बिकेसीपर्यंत वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. याशिवाय लालबाग, दादर, हिंदमाता कुर्ला, सायन माटुंगा, चेंबुर, गोवंडी, धारावी , भांडुप, कंजूरमार्ग, वरळी, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरात पाणी साचल्याने आणि रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
असे असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मुंबईत कुठेही पाणी तुंबले नाही. तसेच रस्त्यावर कुठेही कोंडी झाली नाही. सिग्नलवर गाड्या थांबल्या असल्यातर ती वाहतूक कोंडी म्हणायची का ? असा प्रतिसवाल ही महाडेश्वर यांनी केला. येवढेच नव्हे तर सर्व मुंबईकर आनंदी असल्याचेही त्यांनी संगितले. महापौरांच्या या विधानावर सामान्य मुंबईकरांनी संताप व्यक्त केला.
रहदारीच्या ठिकाणी अनेकवेळा एखादी टवाळखोर मुलांची दुचाकी येते आणि हुलडबाज....
अधिक वाचा