By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकतेच प्रशासनाने ऑरेंज पाठोपाठ रेड अलर्ट जारी केले आहेत. काय आहेत त्याचे अर्थ आणि किती प्रकार आहेत. ते जाणून घेऊया त्यामुळे आपल्याला आपतीची तीव्रता लक्षात येईल आणि आपण सतर्क राहू.
ग्रीन अलर्ट
या अलर्ट चा अर्थ कोणतंही संकट नाही.
यलो अलर्ट
या अलर्टचा अर्थ पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यात येते. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.
ऑरेंज अलर्ट
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. गरज असल्यासच घराबाहेर पाडण्याचे संगितले जाते.
रेड अलर्ट
या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात येतो.
वसई-विरार भागात अतिवृष्टीनंतर 36 तासात 500 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त....
अधिक वाचा