ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू, विद्यार्थी संभ्रमात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू, विद्यार्थी संभ्रमात

शहर : मुंबई

राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरू झाली आहे. मात्र ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर  राज्याची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होत असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. मेडिकल (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रक्रियेत राज्याची सर्वसाधारण पहिली गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. तर मेडिकल प्रवेशाची सेंट्रलाइज ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी ही 6 नोव्हेंबरला सुरू होऊन 12 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.

त्यामुळे ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे . यामुळं कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला असून विद्यार्थी संभ्रमात आहेत.

नीटचा निकाल वाढल्यामुळे राज्याच्या यादीत नेमके स्थान कोणते आहे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. तर प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये राखीव असलेल्या 15 टक्के जागांवरील प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून करण्यात येतात.

या कोट्याची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेणं अवघड झालं आहे. राज्याने गुणवत्ता यादी ऑल इंडिया कोट्याची पहिली फेरी होण्यापूर्वी या जाहीर करावी, अशी मागणी मेडिकल विद्यार्थ्यांनी केली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी – 12 नोव्हेंबर, सायं. 5 वाजेपर्यंत

महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे – 6 ते 13 नोव्हेंबर

पहिली गुणवत्ता यादी – 13 नोव्हेंबर, सकाळी 8

पहिली प्रवेश यादी – 15 नोव्हेंबर, सायंकाळी 5

पहिल्या यादीनुसार प्रवेश घेणे – 20 नोव्हेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

मराठा आरक्षणाला मिळालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया जवळपास मागील 2 महिन्यापासून रखडलेली आहे. तर दुसरीकडे इंजिनिरिंग इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा निर्णय देखील हा तिढा सुटत नाही तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाहीए. तर दुसरीकडे एमपीएससी 2019 परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमात असलेल्या या हजारो विद्यार्थ्यांसमोरचा तिढा कधी सुटणार? हा प्रश्न आहे.

 

 

मागे

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार
पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय सेवेत जाणार

राज्यात लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस महासंच....

अधिक वाचा

पुढे  

अतिवृष्टीमुळे नुकसान ,नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
अतिवृष्टीमुळे नुकसान ,नेत्यांनी भेटी दिलेल्या गावातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी मारू....

Read more