ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

४० लेकरांची माय 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 03:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

४० लेकरांची माय 

शहर : मुंबई

        हिंगोली - जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पण स्वत: पायाने दिव्यांग असलेल्या मीरा गणन-कदम हिंगोलीतील ४० लेकरांची माय बनल्या आहेत. मराठवाड्यातील भयाण दुष्काळानंरत आत्महत्य ग्रस्तांच्या मुलांना आयुष्यात दिशा देण्यासाठी त्या पुढे सरल्या आहेत. एका पायाने दिव्यांग असलेल्या मीरा धनराज गणन-कदम यांच्या सामाजिक कामात त्यांचे पती त्यांच्यासाठी आधार बनले आहेत.


      त्या हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. २०१४-१५ साली हिंगोलीत मोठा दुष्काळ पडला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या निराधार मुलांना आधार देण्याचा वसा मीरा ताईंनी घेतला. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला.

 

       दरम्यान, या मुलांच्या खर्चासाठी त्यांनी स्वत:चा आणि पतीचा पगार यात खर्ची घातला. केवळ इथपर्यंतच न थांबता पुढे त्यांनी हॉटेलात, शेतात, दुकानात काम करणाऱ्या ४० मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. त्यांच्यासाठी एक घरही भाड्यानं घेतलं आणि त्या या अनाथांची माय बनल्या. गरिबांची मुले आज कॉम्प्युटर सायन्सच शिक्षण घेतायत. 


          या मुलांच्या आवडी-निवडी नुसार त्यांचं करिअर घडवलं जात आहे. भविष्यात हीच मुलं मोठं होऊन अनेकांना आधार देतील यात काही शंका नाही. पण या चाळीस मुलांचं संगोपन करता करता हे अनाथाचे माय-बाप कर्जबाजारी बनलेत. त्यांच्या कार्याला उभारी देण्यासाठी, त्यांच्या कार्यास आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे.
 

मागे

शरद पवार करणार इंदु मिलच्या जागेची पाहणी!
शरद पवार करणार इंदु मिलच्या जागेची पाहणी!

           मुंबई : घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्र....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया: पवन कुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निर्भया: पवन कुमार गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

        नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पव....

Read more