ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2020 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बीकेसीत मेट्रो कारशेड? ठाकरे सरकारसाठी आजारापेक्षा औषध भयंकर?

शहर : मुंबई

बीकेसीत जर मेट्रोचं कारशेड उभारलं तर जवळपास ३० हजार कोटींचा तोटा होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत. बीकेसीत मेट्रो कारशेड (Metro Car shed) झाला तर त्याचा फक्त एकच फायदा सांगितला जातोय आणि तो म्हणजे बीकेसीत त्याचं असणं. बीकेसी भाग मुंबईतला सर्वाधिक महागड्या जागांपैकी एक आहे.

रिअल इस्टेटच्या किंमती इथं सर्वाधिक आहेत. अशा ठिकाणी मेट्रो कारशेड उभारला तर महसुलावर पाणी सोडावं लागेल. तसेच त्याच्या उभारणीची किंमत पाच पट असेल असही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीवस यांनी म्हटलंय. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी पुनर्वसन करावं लागेल तेही वेगळं असही जाणकारांना वाटतंय. बीकेसी ग्राऊंड हे २० हेक्टरमध्ये पसरलंय आणि त्याची मालकी ही एमएमआरडीएकडे आहे, त्यामुळे त्याचं अधिग्रहण करणं राज्य सरकारला सहज शक्य होणार आहे.

पण बुलेट ट्रेनसारखंच जर मेट्रो कारशेडही अंडरग्राऊंड करावं लागलं तर त्याची किंमत ही कित्येक पटीनं वाढणार असा अंदाजही वर्तवला जातोय. त्यामुळे सरकारसाठी बीकेसीत मेट्रो कारशेडचा पर्याय वाटतो तेवढा सोपा नसल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत.

बीकेसीत मेट्रो कारशेड का?

मेट्रो कारशेडचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कांजुरमार्ग मेट्रो कारशेडला उच्च न्यायालयानं स्टे दिलाय. त्यानंतर ठाकरे सरकार पर्यायी जागांचा शोध घेतंय. त्यातूनच बीकेसीत मेट्रो कारशेडसाठी जागेची चाचपणी सरकारनं सुरु केलीय. तसे आदेशही सरकारनं दिलेत. कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण कोर्टात किती काळ चालेल याचा अंदाज नाही. त्यामुळे मेट्रोचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीच बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं शिंदे म्हणालेत.

मागे

ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान
ASSOCHAM च्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदी करणार रतन टाटा यांचा पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) ....

अधिक वाचा

पुढे  

सरकारकडून मराठा समाजात फूट पाडण्याचं काम, मेटेंचा गंभीर आरोप
सरकारकडून मराठा समाजात फूट पाडण्याचं काम, मेटेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज सर्व....

Read more