By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 28, 2020 09:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनबाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या अनलॉक 6 नुसार आता 30 ऑक्टोबरपर्यंतच्या निर्बंधांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 30 ऑक्टोबरपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले होते
गृह मंत्रालयाने आज (27 ऑक्टोबर) पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार रिओपनिंगबाबत 30 सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 30 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या काही गोष्टी सुरु राहतील. आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, प्रशिक्षणासाठी जलतरणपटूंसाठी स्विमिंग पूल, तसेच सिनेमा हॉल व मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी होती.
सामाजिक / शैक्षणिक / क्रीडा / करमणूक / सांस्कृतिक / धार्मिक / राजकीय कार्यक्रमांसाठी बंद जागांमध्ये हॉल क्षमतेच्या जास्तीत जास्त 50 टक्के आणि 200 जणांच्या कमाल मर्यादेसह वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
काय सुरु करण्याची परवानगी?
मेट्रो रेल
शॉपिंग मॉल
हॉटेल-रेस्टॉरन्ट
सेवा
धार्मिक स्थळं
योगा आणि प्रशिक्षण संस्था
जीम
सिनेमागृहं
एन्टरटेनमेंट पार्क
राज्यांच्या स्तरावर आढावा घेऊन काय सुरु करण्याची परवानगी?
शाळा
प्रशिक्षण संस्था
संशोधनासाठीचे राज्याचे आणि खासगी विद्यापीठं
100 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी देणे
निर्बंधांसह सुरु करण्याची परवानगी
आंतरराष्ट्रीय विमान प्रवास
खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल
50 टक्के क्षमतेसह सिनेमागृहं
50 टक्के आसनक्षमतेसह आणि 200 पेक्षा व्यक्तींच्या राजकीय सभा, सामाजिक, सांसकृतिक किंवा क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रम
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ....
अधिक वाचा