ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

शहर : मुंबई

हक्काच्या घराच्या शोधात तुम्हीही आहात का? म्हाडा तुम्हाला देतंय ही संधी. वाचा आगामी सोडतीसंदर्भातील ही बातमी.

हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. समाधानकारक नोकरी (Job News) आणि त्यानंतर करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतर या घरासाठीचा शोधही सुरु होतो. अनेकांचं हे स्वप्न सहजगत्या साकार होतं. पण, काहींना मात्र हे स्वप्न साकार करण्यासाठी बराच वेळ, वर्षे दवडावी लागतात. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडा आणि सिडको (Cidco) सारख्या संस्थांची. मुंबई, कोकण भागामध्ये किमान दरात समाधानकारक गृहसंकुलं उभारणाऱ्या म्हाडाकडून येत्या काळात आणखी एक सोडत काढण्यात येणार असून, 5 हजारांहून अधिक इच्छुकांना स्वत:चं घर मिळवण्यात यश मिळणार आहे.

अखेर रखडलेल्या सोडतीला मुहूर्त मिळाला

म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांची सोडत गेल्या काही दिवसांपासून रखडली असून, यामुळं 24 हजारांहून अधिक अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. या त्या कारणानं ही सोडत लांबतच चाललेली असताना आता मात्र सोडतीसाठीचा मुहूर्त मिळाल्याची चिन्हं आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सोडत काढण्यासाठी म्हाडा आग्रही असून, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठीचे प्रयत्नही सुरुच आहेत. पण, काही कारणास्तव त्यांची वेळ मिळत नसल्याने सोडत मात्र लांबणीवर पडली आहे. सध्या मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असून, त्या ठिकाणहून परतल्यानंतर राम मंदिराचे उद्घाटन आणि पुढे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी ते वेळ देतील. थोडक्यात ही सोडत 26 जानेवारीनंतरच पार पडू शकते अशी दाट शक्यता आहे.

अर्जदारांची निराशा

(Application for Mhada housing Lottery) म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत असताना 5311 घरांसाठी जवळपास 24 हजार अर्जदारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज भरताना त्यांनी अमानत रक्कमही जोडली असल्यामुळं मोठ्या संख्येनं अर्जदारांचे पैसे या योजनेसाठी अडकले आहेत. कैक अर्जदारांनी एकाहून अधिक अर्ज आणि त्यासाठीची अनामत रक्कम भरली असल्यामुळं म्हाडाकडून ही सोडत शक्य तितक्या लवकर जाहीर करावी अशी मागणी त्यांच्याकडून यंत्रणांना करण्यात येत आहे. अर्जदारांची ही आर्जव आणि मुख्यमंत्र्यांचा वेळ या गोष्टींचा मेळ साधत आता म्हाडा नेमकी सोडत जानेवारी अखेरीस जाहीर करणार की ही तारीख आणखी लांबणीवर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मागे

 अयोध्या में राम आयेंगे… दारू, चिकन, मटण शॉप बंद ठेवा, पुणेकरांची मागणी
अयोध्या में राम आयेंगे… दारू, चिकन, मटण शॉप बंद ठेवा, पुणेकरांची मागणी

22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडणार आहे. या ....

अधिक वाचा

पुढे  

कायद्यानुसार एका व्यक्तीकडे किती जमीन असू शकते? महाराष्ट्रात काय नियम?
कायद्यानुसार एका व्यक्तीकडे किती जमीन असू शकते? महाराष्ट्रात काय नियम?

आपल्याकडे असणारा जमिनीता भाग कायदेशी आहे की बेकायदेशीर? कायद्याच्याच तरतु....

Read more