ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपुरमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; मिलिंद पखालेंची पक्षाला सोडचिठ्ठी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपुरमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; मिलिंद पखालेंची पक्षाला सोडचिठ्ठी

शहर : नागपूर

वंचित बहुजन आघाडीला नागपुरात मोठा धक्का बसला आहे. पक्ष प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडताना त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडी भाजपला निवडून आणण्यासाठी काम करत असल्याचा मिलिंद पखाले यांनी आरोप करत पक्षाला रामराम ठोकला आहे. वंचित बहुजन आघाडी ‘भाजपची बी टीम’ असल्याच्या आरोप सातत्याने काँग्रेस करत आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्याने भाजपला निवडून आणण्यासाठी पक्ष काम करत असल्याच्या गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवैसी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपसह काँग्रेसला जोरदार लक्ष्य केलं होतं. आणि भाजप-काँग्रेस एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मागे

पंजाबमध्ये राहुल गांधींचे रटाळ भाषण, मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांच्या डुलक्यांवर डुलक्या!
पंजाबमध्ये राहुल गांधींचे रटाळ भाषण, मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांच्या डुलक्यांवर डुलक्या!

शेवटच्या टप्प्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजा....

अधिक वाचा

पुढे  

उत्तर प्रदेशमध्ये तोंडात स्फोट झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू
उत्तर प्रदेशमध्ये तोंडात स्फोट झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू

एका महिलेच्या तोंडात स्फोट झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिले....

Read more