By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
पाकिस्तानमध्ये महागाईमुळे सामान्य जनता चांगलीच होरपळून निघत आहे. येथे केवळ अन्न धान्याच्याच नव्हे तर पेट्रोल डिझेल सोबतच दुधाच्या किमती देखील सामन्याच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गेल्या महिन्यात पेट्रोल प्रतिलीटर 117.83 रुपये तर डिझेलचा दर 132.47 रुपये होता. महत्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल-डिझेलपेक्षा दुधाचा दर प्रती लिटरला 140 रुपये होता. याचा परिणाम मोहरम सणावर ही झाला.
मोहरम हा मुस्लिमांचा विशेष सण आहे. या सणाला दुधाची मागणी वाढते. कारण या सणात प्रत्येक घरात दुधाचे सरबत, खीर असे पदार्थ बनवले जातात. याचाच फायदा घेण्यासाठी डेअरी माफियानी दुधाच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे.
त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्....
अधिक वाचा