By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - वर्षाच्या सुरुवातीलाच दूध दरवाढीची झळ सामान्य वर्गाला बसली आहे. राज्यात दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर बटर आणि पनीरचे दर गगनाला भिडले असून प्रत्येकी १०० ते २०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली असली तरी याचा लाभ शेतक-यांपेक्षा व्यवसायिकांनाच अधिक होत आहे.
मात्र, दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकरी नुकसान सोसत आहेत. सामान्यता शेतक-याला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत त्यांचा उत्पादन खर्चही भागत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. गायीचं दूध ४६ रुपयांवरुन ४८ रुपये तर, म्हशीचं दूध ५६ वरून ५८ रुपयांवर पोहोचलं आहे. दुधाच्या विक्रीत एका महिन्यात तब्बल चार रुपयांची दरवाढ झाली असल्याने दुधासोबत बटर ३२० आणि दूध पावडर प्रतिकिलो ३३० रुपयांवर पोहोचली आहे.
दरम्यान, राज्यातील ७३ संघांच्या प्रतिनीधींच्या उपस्थित दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. राज्यात २०१९ च्या तुलनेत २० ते ३० टक्के दुधाचे उत्पादन घटले आहे. तर राज्यात सद्यस्थितीला दोन कोटी ४० लाख प्रतिदिन दुधाचे उत्पादन होते. राज्यात दररोज सुमारे ६५ लाख लीटर पॅकिंग दुधाची विक्री होते तर बटर आणि दूध पावडरची बाजारात जास्त मागणी आहे.
तर दुसरीकडे शेतक-यांच्या पदरात काहीच पडत नसल्याची खंत शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहे. शेतक-यांना गायीच्या दुधाला ३१ तर म्हशीच्या दुधाला ४५ रुपये मिळतात. गेल्या महिन्यात चार रुपयांची वाढ झाल्याने आम्हालाही वाढ करणे भागच आहे असे शेतक-यांचे मत आहे. पण यामुळे ग्राहकांवर परिणाम होणार असल्याची भीतीही शेतक-यांना सतावत आहे. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याचा खर्च भागत नाही तर दुसरीकडे व्यावसायिक मात्र भरमसाठ नफा कमावत आहेत.
नवी दिल्ली – पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशदवादी हल्ले, ....
अधिक वाचा