ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कामगारांच्या वेतनात दुप्पट वाढ

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 02:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कामगारांच्या वेतनात दुप्पट वाढ

शहर : मुंबई

महाराष्ट्रातील 10 लाख दुकाने आणि आस्थापनातील सुमारे 1 कोटी कामगाराना फायदा होईल असा निर्णय कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी घेतला आहे. ही वाढ सुमारे दुप्पट असणार आहे. किमान वेतन अधिनियम 1948 च्या कलम 3 अन्वये दर 5 वर्षानी किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने रोजगाराचे किमान वेतन पुनर्निर्धारीत करता आले नव्हते. कामगार मंत्री कुंटे यांच्या पाठपुराव्यामुळे कामगारवर्गाला किमान वेतन मिळणे शक्य झाले आहे.

यात महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रे तसेच महापालिका क्षेत्रापासून 20 किमी पर्यंतचे औदोगिक क्षेत्र व छावणी क्षेत्र या परिमंडळात काम करणार्‍या कुशल कामगारांना 5800 वरुन 11632 अर्धकुशल कामगारांना, 5400 वरुन 10856 अकुशल कामगारांना 5000 वरुन 10021 नगर परिषद परिमंडळातील कुशल कामगाराना 5,500 वरुन 11,036 अर्धकुशल कामगारांना 5100 वरुन 10260 व अकुशल कामगारांना 4700 वरुन 9425 याशिवाय राज्याच्या उर्वरित क्षेत्रात कुशल कामगारांना 5200 वरुन, 10440 अर्धकुशल कामगारांना 4800 वरुण 9664 व अकुशल कामगारांना 4400 वरुन 8828 एवढी वेतन वाढ पुनर्निधारीत करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना दिनांक 24 जुलै 2019 पासून लागू करण्यात आली आहे.

मागे

कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान
कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान

 मुंबईतील जगप्रसिद्ध 'ताज' हॉटेलने गेली 10 वर्ष मनमानी करून पार्किंग साठ....

अधिक वाचा

पुढे  

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

तीन दिवसांपूर्वी डोंबिवली जवळ लोकलमधून पडून तीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू ....

Read more